दस्तगीर बौवडीवाले यांच्या विवाह सोहळ्यात राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची हजेरी

लोहारा ( जि.धाराशिव, महाराष्ट्र ) माजी भाजपा तालुका सरचिटणीस तथा मराठी पत्रकार संघ लोहारा तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला यांचा मेव्हणा जैननुददीन बौवडीवाले यांचा चिरंजीव दस्तगीर बौवडीवाले यांचा विवाह सोहळ्याचा रिसेप्शन (स्वागत समारंभ) कार्यक्रम आळंद कर्नाटक येथील K.G.N. फंक्शन हॉल येथे दि.1 डिसेंबर 2023 रोजी उत्साहात संपन्न झाला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, मा. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवंडी, रोहयोचे मा.चेअरमन आयुब अब्दुल शेख, मा. भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य कमलाकर सिरसाठ, शिवसेना नेते अन्वर शहा, नयुम सवार, अनंत कानेगांवकर, शेरु मासुलदार, मिनाज बौवडीवाले, जब्बार मुल्ला, दादा मुल्ला, खाशिम मुल्ला, आदम मुल्ला, बहादुर शेख, महेबुब शेख, फजलुर सय्यद, महमहद पटेल, अहेमद जहागीरदार, हुमायुन शेख, महेबुबपाशा बौवडीवाले, बिलाल मुल्ला, जलाल मुल्ला, रफिक शेख, आदि, उपस्थित होते.