श्रीशैल जट्टे यांना महात्मा फुले स्मृती पुरस्कार जाहीर

लोहारा ( जि.धाराशिव ) : स्मृतीशेष रामलिंग वैरागकर सामाजिक प्रतिष्ठान मार्फत दिला जाणारा यावर्षीचा महात्मा फुले स्मृती पुरस्कार जिल्हा परिषद कानेगाव येथील शिक्षक श्रीशैल मनोहर जट्टे यांना जाहीर झाला आहे. श्रीशैल जट्टे यांची सेवा 24 वर्षे झाली असून शिक्षण क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेख निय आहे. सदर कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे
सदरील पुरस्कार 28 डिसेंबर 2023 रोजी उमरगा येथे प्रदान करण्यात येत आहे .याबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.