प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिबिरात 132 रुग्णांची मोफत तपासणी

लोहारा : लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी 14 जानेवारी रोजी मोफत ताणतणाव निवारण व सर्वरोग निदान शिबीर घेण्यात आले याप्रसंगी 132 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
या शिबाराचे उदघाटन कानेगावचे सरपंच नामदेव लोभे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयातील मनोविकार तज्ञ डॉ.राजेश नरवाडे, कानेगावच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रियंका बंदीछोडे, आरोग्य अधिकारी, कर्मचारी,आशा कार्यकर्ती उपस्थित होते. या शिबिरामध्ये 73 पुरुष व 49 महीला असे एकूण 132 रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आला आहे. यावेळी सुञसंचालन वर्षा घोडके यांनी केले.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!