“महात्मा जोतिबा फुले स्मृती ग्रामीण पत्रकारिता” पुरस्कार कोरे यांना जाहीर

लोहारा (जि.धाराशिव ) : उमरगा येथील स्मृतीशेष रामलिंगप्पा वैरागकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा “महात्मा जोतिबा फुले स्मृती ग्रामीण पत्रकारिता” पुरस्कार लोहारा तालुक्यातील जेवळी येथील दै. सकाळचे पत्रकार सुधीर कोरे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराची घोषणा सोमवारी (ता.२७) करण्यात आली. सुधीर कोरे मागील जवळपास २७ वर्षांपासून दै तरुण भारत, दै गावकरी, दै लोकमत, दै सकाळ आदी वृत्तपत्रांत पत्रकारीत केली आहे. सध्या गेल्या २२ वर्षापासून दै सकाळमध्ये कार्यरत आहे. त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना वाचा फोडून सर्वसामान्यांना न्याय दिला आहे. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय विषयावर सातत्याने लिहितात. एक सच्चा, निर्भिड व प्रामाणिक पत्रकार म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. या पुरस्काराचे वितरण २८ डिसेंबर रोजी उमरगा येथे होणार आहे. अशी महीती स्मृतीशेष रामलिंगप्पा वैरागकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे. यापूर्वी ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा, संपादक संजय आवटे, सामाजिक कार्यकत्यां मेधा पाटकर, पत्रकार राजेंद्र गुंजे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. सोमनाथ रोडे, जयप्रकाश दगडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!