लोहारा येथे घेतली संविधानाच्या संरक्षणाची शपथ

लोहारा : लोहारा येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संविधान संरक्षणाची शपथ उपस्थितांनी घेतली. भारतीय बौध्द महासभा व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी 9:00वाजता शहरातील छ्त्रपती शिवाजी महाराज चौक येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.त्याचा भाग म्हणुन हा कार्यक्रम घेण्यात आला.
सामाजिक कार्यकर्त्या रंजना ताई हासुरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाले. तर उपस्थित नगरसेवक विविध पक्ष संघटना पदाधिकारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व पुष्प अर्पण करण्यात आले. त्रिसरण पठन करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून भारतीय संविधानाचे संरक्षण करण्या संदर्भात सामुदायिकरीत्या शपथ घेतली. सामाजिक कार्यकर्त्या रंजना ताई हासुरे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी भारतीय बौध्द महासभा तालुका अध्यक्ष तानाजी माटे व डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीचे अध्यक्ष शैलेश कांबळे,
रंजनाताई हासुरे, नगरसेवक जालिंदर कोकणचे, प्रशांत काळे, दिपक मुळे, श्रीकांत भरणारे, श्रीनिवास माळी, प्रमोद बंगले, गौस मोमीन, जि. प. के. प्रा. शा. केंद्र प्रमुख मोहन शेवाळे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा कोषाध्यक्ष नेताजी शिंदे,न्युज व्हिजन इंग्लीश स्कूलचे प्राचार्य शहाजी जाधव, ज्येष्ठ नागरिक विलास कुलकर्णी,युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष हरी लोखंडे हाजी बाबा शेख,मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष इक्बाल मुल्ला, माजी सरपंच नवाज सय्यद,जिंदावली शेख, शाम नारायणराव, रिपाइं तालुका अध्यक्ष दिगंबर कांबळे,श्रीकांत कांबळे, बाळू शिंदे, तुळजाराम कांबळे, मिलींद नागवंशी, मिलाफ ग्रुपचे अध्यक्ष दादा मुल्ला, आझाद ग्रुपचे अध्यक्ष अल्ताफ सुंबेकर, आधुनिक लहूजी सेना जिल्हा को.क. अध्यक्ष दिपक रोडगे, तालुका अध्यक्ष नितीन रोडगे, आर पी आय तालुका उपाध्यक्ष सर्जेराव बनसोडे, ज्येष्ठ पत्रकार निळकंठ कांबळे,अशोक दुबे, बालाजी बिराजदार, अशोक दुबे,अब्बास शेख, गिरीश भगत, सुनिल ठेले यांची उपस्थिती होती.
तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतुल कांबळे, कार्तिक शिंदे,कार्तिक कांबळे, रवि पवार, लक्ष्मण सगट, बालाजी कसबे, संभाजी जवादे, स्वप्निल माटे,मोहन वाघमारे, पुरूषोत्तम सितापूरे, दिलीप कांबळे, बाबुराव रेनके यांनी परिश्रम घेतले.
चौकट
26/11हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली
मुंबई येथे 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिद जवानांना यावेळी दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
————————–
भाजपा व आधुनिक लहूजी सेना यांच्यावतीने कार्यक्रम स्थळी भेट देऊन संविधान गौरव दिनानिमित्त संविधान व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष शिवशंकर हत्तरगे मा जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी रिपाई तालुका अध्यक्ष दिगंबर कांबळे रिपाई रोजगार आघाडी जिल्हा अध्यक्ष उत्तम भालेराव तानाजी गायकवाड बाबा सुबकर मल्लिनाथ फावडे मा तालुका अध्यक्ष प्रमोद पोतदार विजय म्हनूर वैजिनाथ जट्टे सतीश गिरी शिवा थोरात लक्ष्मण रोडगे तर आधुनिक लहूजी सेना वतीने
आधुनिक लहुजी सेना धाराशिव जिल्हा को.कमिटी,अध्यक्ष दिपक भाऊ रोडगे,तालूका अध्यक्ष नितीन भाऊ रोडगे ,शहरअध्यक्ष अभिजित सगट,सो.मि.तालुका प्रमुख बालाजी भाऊ कसबे, आर.पी.आय तालुका उपाध्यक्ष सर्जेराव बनसोडे उपस्थित होते.