लोहारा शहर बंदची हक्क

लोहारा (जि.धाराशिव ) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी श्री मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. त्यांची प्रकृती खालावली जात असताना राज्य सरकारकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप करीत समाजाकडून गावा गावात उपोषण, रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. त्यातच लोहारा तहसिल कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु आहे. त्यात मंगळवारी लोहारा शहर बंदची हक्क समाजाकडून देण्यात आली असून सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यत व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेऊन पाठींबा दर्शविण्याचे अवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.