शारदीय नवरात्र महोत्सवास प्रारंभ ; श्री. तुळजाभवानी देवी मंदिरात घटस्थापना

तुळजापुर : महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री. तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास आज रविवारी 15 ऑक्टोबर 2023 रोजी रविवारपासून तुळजापूर येथे धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. श्री.तुळजाभवानी मंदिरात पहाटे पारंपारिक पध्दतीने श्री.तुळजाभवानी देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. दुपारी 12 वाजता श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते आज सपत्निक विधिवत घटस्थापना करण्यात आली.

मंत्रोपच्चाराने तसेच आई तुळजाभवानी उदो-उदोच्या जयघोषात पारंपारिक संबळ वाद्याच्या साथीने सर्व पुजाविधी करण्यात आले.
घट कलशांची पारंपारिक पध्दतीने पुजा करुन गोमुख तीर्थापासून या घट कलशांची मिरवणूक काढण्यात आली. मंदिरातील गाभाऱ्यात तसेच खंडोबा मंदिर, यमाईदेवी मंदिर, टोळभैरव आणि आदिमाया आदिशक्ति या मंदिरामध्ये जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.

मंदिर व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने भाविकांच्या दर्शनाच्या सोयीसाठी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर www.shrituljabhavani.org ऑनलाईन दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी या सुलभ दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी करुन सर्व भाविकांना शारदीय नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.


यावेळी श्री.तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील धार्मिक कार्यक्रमास आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अर्चनाताई पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ.योगेश खरमाटे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) सोमनाथ माळी, मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले, सहायक जनसंपर्क अधिकारी गणेश मोटे, धार्मिक अधिकारी श्री.काटकर,महंत तुकोजी बुवा,महंत वाकोजी बुवा, चिलोजी बुवा,डॉ. अक्षय पाटील तसेच पाळीकर पुजारी मंडळ,उपाध्ये मंडळ व भोपे पुजारी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!