जय जगदंबा नवरात्र महोत्सव मंडळाच्या देवीची आरती पत्रकारांच्या हस्ते

लोहारा / प्रतिनिधी
लोहारा शहरातील सर्वात जुने जय जगदंबा नवरात्र महोत्सव मंडळाच्या देवीची आरती लोहारा शहरातील पत्रकारांच्या हस्ते पहिल्या माळेच्या मुहूर्तावर करण्यात आली.मंडळाच्या वतीने पत्रकार बांधवांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
जय जगदंबा नवरात्र महोत्सव मंडळ यावर्षी ५१ वा नवरात्र उत्सव साजरा करत आहे.यावेळी देवीच्या आरतीला प्रत्येक दिवशी विविध राजकिय,सामाजिक, जेष्ठ नागरिक,महिला,व्यापारी,वकील,डॉक्टर,पत्रकार यांना मान देण्यात आला आहे.
यावेळी लोहारा शहरातील पत्रकार निळकंठ कांबळे, बालाजी बिराजदार,कालिदास गोरे,गिरीश भगत, अब्बास शेख,जसवंतसिंह बायस,अशोक दुबे, विक्रांत संगशेट्टी,गणेश खबोले,यशवंत भुसारे,सुमित झिंगाडे उपस्थित होते.मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्कार पर पत्रकार जसवंतसिह बायस यांनी पत्रकारांच्या वतीने मनोगत व्यक्त करत मंडळाचे आभार मानले.
यावेळी नवरात्र उत्सव मंडळ अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील,उपाध्यक्षबाळु माळी,सचिव प्रेम लांडगे,प्रशांत लांडगे,नगरसेवक प्रशांत काळे,हरि लोखंडे,प्रशांत जाधव,सुनील देशमाने,बाळु माळी, विजय महानूर,नागनाथ जाधव,आकाश विरुधे,चेतक पवार,बलभीम विरुदे, श्रीकांत तिगाडे,मुकुंद पवार, सुरज लोहार,राहुल विरुधे,प्रशांत रेणके,कृष्णा विरुधे,राजेश भोरे उपस्थित होते.