जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या संघाला मिळाले उपविजेतेपद…

लोहारा (जि.धाराशिव) : धाराशिव येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तर फुटबॉल स्पर्धेत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कास्ती बु च्या संघाने उपविजेतेपद पटकावले. शाळेने मिळवलेल्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, गटशिक्षण कार्यालय यांच्यावतीने क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गटशिक्षण कार्यालयाचे कार्यालयीन विस्ताराधिकारी श्री .भास्कर बेशकराव, लोहारा बीटचे शिक्षण विस्ताराधिकारी श्री .सुभाष चव्हाण, सरपंच आखिल तांबोळी कास्ती केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. गजानन मक्तेदार, साधन व्यक्ती श्री .अनंत लाहने, शाळेचे मुख्याध्यापक श्री. चंदनशिवे मधुकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. बळीराम साबळे, सदस्य श्री. नागेश चव्हाण. सामाजिक कार्यकर्ते श्री.परवेज तांबोळी, स्पर्धेत स्पर्धेत यश मिळवलेल्या खेळाडूंचे पालक श्री. अकबर मुल्ला, श्री. देवीदास बेशकराव, श्री. बाळू भंडारे, श्री. लहू भंडारे, श्री. सिद्धेश्वर घोडके, श्री तायाप्पा चव्हाण, श्री. मकसूद मुल्ला, श्री विजय भालेराव, श्रीमती मंदोदरी कोळी उपस्थित होते. यावेळी तालुकास्तरीय स्पर्धेत 400 मीटर धावणे प्रकारात प्रथम क्रमांक मिळवलेल्या कु. वर्षा राठोड, 200 मीटर धावणे प्रकारात कल्लेश्वर जगदाळे तृतीय क्रमांक, योगा स्पर्धेत द्वितीय क्रमांक आलेला मोतीराम राठोड, 100*4 रिले प्रकारात प्रथम क्रमांक मिळवलेल्या कु. वर्षा राठोड, कु श्रावणी समदाळे, कु. प्रतीक्षा बेशकराव, कु. वैष्णवी दंडगुले, कु. श्रद्धा चव्हाण कु. वैभवी रवळे यांचाही सत्कार करण्यात आला. फुटबॉल संघातील खेळाडूंचा पुढील प्रमाणे सत्कार करण्यात आला. संघाचा कर्णधार किरण घोडके, अब्बास मुल्ला, धनराज बेशकराव, कुणाल राठोड, निखिल वाघमारे, विराट कदम, मुशर्रफ मुल्ला, रुद्र कदम, अभिजीत भंडारे, रोहन चव्हाण, यश भंडारे, समर्थ कोळी, अरविंद राठोड, आशुतोष शेगजी, केतन सोनटक्के , मार्गदर्शक श्री प्रवीण अगंबरे, श्री .नितीन कदम श्री व्यंकट पोतदार.श्री नितीन वाघमारे यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री चंदनशिवे मधुकर, केंद्रप्रमुख गजानन मक्तेदार, शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष चव्हाण, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भास्कर बेशकराव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वाघमारे नितीन यांनी तर आभार श्री शेख एस. एम सरांनी मानले. यावेळी शाळेतील शिक्षक श्री. एकनाथ कदम, बालाजी सोमवंशी, श्री. शिवाजी पोतदार, श्रीमती वाघमारे यांच्यासह पालक उपस्थित होते.