स्वराज्य ग्रुपच्या वतीने श्री’ची प्रतिष्ठापणा

लोहारा (धाराशिव ) : लोहारा तालुक्यातील भातागळी येथील स्वराज्य ग्रुपच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी स्वराज्य चौकामध्ये ‘श्री’ची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे.
याप्रसंगी प्रमुख उपस्थिती माजी पोलीस उपनिरीक्षक रवी (बप्पा) जगताप कानेगाव बीटचे अंमलदार हणमंत पापुलवार, उत्तम (आण्णा) सुरवसे, उपसरपंच हणमंत (चाचा) कारभारी, मा.उपसरपंच तानाजी (बापू) आनंदगावकर, दत्ता (भाऊ) वाघमारे यांच्या शुभहस्ते प्रसन्न वातावरणामध्ये पारंपारिक पद्धतीने हालगी वाजवून श्रींची आरती करण्यात आली.
सोबतच मंडळाच्या नवीन सभामंडपाची व नवीन साऊंड सिस्टीमची मान्यवरांच्या हस्ते पुजा करण्यात आली.
यावेळी स्वराज्य ग्रुपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते व त्याचबरोबर इतर सामाजिक उपक्रमही राबविण्यात येतात.
प्रति वर्षाप्रमाणे ह्या ही वर्षी हे असेच निरंतर राहील, वेळोवेळी गावकऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभते ह्या ही वर्षी आपण असेच सहकार्य कराल ही अपेक्षा…