दारू पार्टीचे आयोजन करणारा शिक्षक निलंबित

शिवपुरी : मध्य प्रदेशमधील शिवपुरी जिल्ह्यातील पोटा गावातील एका शासकीय शाळेतील शिक्षकांने चक्क शाळेच्या आवारातच दारू पार्टीचे आयोजन केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे शिक्षण प्रेमीतुन तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सोमवारी या पार्टीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. दारू पार्टीचे आयोजन करणाऱ्या संबंधित शिक्षकाला निलंबित करण्यात आले. या शिक्षकाने अनेकदा शाळेच्या आवारात दारू पार्टीचे आयोजन केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला जात आहे. तसेच , याचे व्हिडीओ सुटींग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना त्याने मारहाण केल्याचे देखील गावकऱ्यांनी सांगत आहेत.



