स्पर्श भारतातील कुठल्याची पंचतारांकित रुग्णालयाच्या दर्जाचे – डॉ.सचिन ओंबासे

लोहारा (उस्मानाबाद ) : उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्री.सचिन ओम्बासे यांनी आज दि. ०२/११/२०२२ रोजी ग्रामीण रुग्णालय सास्तूर स्पर्शला गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमच्या आरोग्य विभागाच्या जिल्हा स्तरीय बैठकीसाठी आले होते. या वेळी त्यांनी स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या दैनंदिन कामकाजाची सूक्ष्म पाहणी केली. तसेच या बैठकीसाठी आलेल्या उस्मानाबाद जिल्हयाच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांना NQAS, लक्ष्य, कायाकल्प पुरस्कार प्राप्त ग्रामीण रुग्णालय स्पर्शने कसे व काय नियोजन केले, काय परिश्रम घेतले याची पाहणी सर्वांनी करून प्रत्येक ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य, उपजिल्हा रुग्णालय यांनी केंद्रशासनाच्या गुणवत्ता आश्वासन कार्क्रमात सहभाग नोंदवून संपूर्ण तयारी करावी व आदर्श रुग्णसेवा देण्यासाठी प्रयत्नरत राहण्याचे आवाहन त्यांनी सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व वैद्यकीय अधिक्षक यांना या बैठकीत मार्गदर्शन करताना केले. या बैठकीत त्यांनी ग्रामीण रुग्णालय सास्तूर स्पर्श्चे विशेष कौतुक केले “ ग्रामीण रुग्णालय स्पर्शचा” दर्जा भारतातील कोणत्याही पंचतारांकित हॉस्पिटल पेक्षा कमी नाही. स्वच्छते बरोबरच इथल्या कर्मचाऱ्यांचा सकारत्मक दृष्टीकोन व प्रत्येक काम उत्साहाने करण्याचा गुण सर्वच आरोग्य कर्माचार्यांनी आत्मसात करावा असे गौरोदगार त्यांनी ग्रामीण रुग्णालय स्पर्श बद्दल काढले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राहुल गुप्ता यांनी ग्रामीण रुग्णालय स्पर्शच्या दर्जा प्रमाणे आम्ही प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात सुविधा उपलब्ध काम करणार असल्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते एच.आय.व्ही. संसर्गित बालकांना सकस आहाराचे वाटप करण्यात आले दर महिन्याला ८५ एच.आय.व्ही. संसर्गित बालकांना सकस आहार दिला जाणार आहे. तसेच याच कार्क्रमात ग्रामीण रुग्णालय स्पर्शने नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत तयार केलेले गरोदर मातांसाठीच्या “आई होताना” या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. पुस्तिकेमध्ये गरोदर पनामध्ये घावयाची काळजी, गरोदर मातांसाठी आहार विषयक माहिती आरोग्य विषयक संदेश देण्यात आलेत.
या कार्यक्रमाला सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क डॉ. सुशील चव्हाण, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. के.के. मिटकरी उपस्थित होते. कार्याक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामीण रुग्णालय स्पर्शच्या सर्व कर्मचार्यांनी परिश्रम केले.
या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल प्रकल्प अधिकारी श्री रमाकांत जोशी यांनी सर्व मान्यवर रुग्ण यांचे आभार व्यक्त केले.