गोपाळकाला निमित्त विद्यार्थ्यांनी दहीहंडी कार्यक्रम

लोहारा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलवाडी येथे गोपाळकाला निमित्त विद्यार्थ्यांनी दहीहंडी कार्यक्रम केला दांडिया नृत्य व अनेक उपक्रम साजरी केले. अनेक विद्यार्थी राधा व कृष्णाच्या वेशभूषा मध्ये उपस्थित झाले. मुलांनी मनोरा करून दहीहंडी फोडली. प्रसंगी गावातील सर्व नागरिकांनी विद्यार्थ्यांची कौतुक केले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर सूर्यवंशी शिक्षक अनंत कानेगावकर ,मोरवे खिजर, निर्मळे सुनंदा ,कलशेट्टी मलिकार्जुन यांनी परिश्रम घेतले.