लोहारा शहरातील शिवनगर येथे शिव मित्र मंडळाच्या वतीने दही हंडी उत्सव साजरा

लोहारा : गोविंदा आला रे आला च्या जयघोषात लोहारा शहरातील शिवनगर येथे शिव मित्र मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी आयोजित केलेली दही हांडी गुरुवारी (दि.७) रात्री ७ वाजून १० मिनिटाला शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात फोडण्यात आली.
शहरातील शिवनगर येथे गेल्या २० वर्षापासून शिव मित्र मंडळाच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दही हंडी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याही वर्षी दही हंडी चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ही दहिहंडी फोडण्यासाठी शिव मित्र मंडळाच्या युवकांनी ३ मानवी मनोरे तयार केले होते. यावेळी श्रीकृष्णाची वेशभूषा परिधान केलेल्या अभिजित क्षिरसागर या गोविंदाने मोठ्या जल्लोषात दही हंडी फोडली.
या गोविंदा पथकात चैतन्य माळी, किशोर माळी, योगेश बिराजदार, गौरव गोसावी, प्रकाश लोखंडे, विक्रम माळी, अभिजित माळी, संदेश शेटे, महेश पाटील, महेश बिराजदार, राम परसे, यांच्यासह आदींचा गोविंदा पथकात समावेश होता.

HTML img Tag Simply Easy Learning

यावेळी श्रीनिवास माळी,शिवसेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, राजेंद्र माळी, अशोक दुबे,बालाजी माळी, बजरंग माळी, विष्णू माळी, कमलाकर मुळे, इरशाद तळणीवाले, शुभम माळी, सोमनाथ मुळे, धिरज माळी, अंकुश परीट, संकेत माळी, भिमाशंकर मुळे, अशोक काटे, सचिन भरारे, यांच्यासह शहरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी दही हंडी पाहण्यासाठी बाल गोपाळांसह महिलांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी उपस्थित नागरिकांना काल्याच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.

 

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!