न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांनी घेतली चांद्रयान -3 मोहीमची माहिती

लोहारा : न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांनी घेतली चांद्रयान -3 मोहीमची माहिती. दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी भारत देशाच्या इस्रो या संस्थेच्या माध्यमातून भारतीय शास्त्रज्ञांनी चांद्रयान -3 हि मोहीम यशस्वी केली.भारतीय वैज्ञानिक आणि संशोधन संस्थेच्या (ISRO ) शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्न व परिश्रमातून चांद्रयान 3 विक्रम लाँनडर बुधवारी 05 वाजून 44 मिनिटांनी चंद्रावर उतरवण्याची प्रक्रिया सुरू होऊन ती यशस्वी झाली. याची सर्व प्राथमिक माहिती व प्रात्यक्षिक हे शाळेतील विध्यार्थी पार्थ कोठावळे, प्रेमराज रवळे,अंकिता पाल, श्रावणी मंडले, मनस्वी देवकर, यांनी माहितीसह सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी मैदानावर भारताचा नकाशा तयार करून, तिरंगा ध्वज हातात घेवुन भारतीय शास्त्रज्ञांना मानवंदना दिली आणि भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. शाळेतील विद्यार्थ्यांना यासाठी यशवंत चंदनशिवे, व्यंकटेश पोतदार, सिद्धेश्र्वर सुरवसे, प्रेमदास राठोड, सविता जाधव, सोनाली माळी, मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी स्कुलचे मुख्याध्यापक श्री शहाजी जाधव यांनी मार्गदर्शक शिक्षक व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि सांगितले की , इस्रोच्या माध्यमातून आपल्या देशातील शास्त्रज्ञांनी चंद्राला गवसणी घातली, म्हणून आजचा दिवस हा देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!