चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाल्यानंतर शहरात फटाके फोढून आनंदोत्सव साजरा

इक्बाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
विस्त्रोने आज बुधवारी चांद्रयान 3 मोहिम यशस्वी केली. गेल्या अनेक दिवसांपासून मोहिम यशस्वी करण्यासाठी शास्त्राज्ञाने मोठे परिश्रम घेतले. मोहिम यशस्वी होण्यासाठी भारतीय नागरिकांनी मंदिर मशीदीमध्ये प्रार्थना करीत होते. अखेर आज हि मोहीम यशस्वी ठरली. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. लोहारा शहरात ठिकठिकाणी फटाके फोढून आनंदोत्सव उत्सव साजरा केला. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध पक्ष व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करुन जल्लोष केला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, शिवसेना नेते अभिमान खराडे, नगरसेवक अविनाश माळी, रोहयोचे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, पत्रकार निळकंठ कांबळे, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, नगरसेवक गौस मोमिन, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, भाजपा जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेटटी, भाजपा तालुका सरचिटणीस इक्बाल मुल्ला, कॉंग्रेस शहराध्यक्ष आयनुददीन सवार, शिवानंद मुळे, बाबु हेडडे, अब्बास शेख, अदि उपस्थित होते.