गाव तेथे शाखा घर तेथे शिवसैनिक अभियाना अंतर्गत नागुर येथे बैठक

लोहारा : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक नागुर मध्ये 22 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता संपन्न झाली.
लोहारा तालुक्यातील गाव तेथे शाखा घर तेथे शिवसैनिक अभियाना अंतर्गत नागुर या गावी बैठक घेण्यात आली.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांनी बोलत असताना शिवसेना शाखाप्रमुख,युवासेना शाखाप्रमुख यांनी करावयाची कामे काय असतात याचे सविस्तर विश्लेशन केले.तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सर्व शिवसैनिक नक्कीच आपली मदत तत्परतेने करतील याची ग्वाहीही नागरीकांना दिली.शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी केलेल्या कार्याचा आढावा लोकांना सांगीतला.कोरोणा काळातील कार्याबद्दल मुख्यमंत्र्याच्या यादित पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धवसाहेबांचा पहिला नंबर होता.त्यावेळीचेही कार्य लोकांना सांगीतले.तसेच मा.खा.ओमदादा यांनी तळागाळातील नागरीकांशी जोडुन ठेवलेली नाळ व लोकांचे कार्य करण्याची पद्धत सर्व शिवसैनिकांनी याचा आदर्श घेऊन काम करावे ही विनंती केली.
यावेळी नवनियुक्त शाखाप्रमुख दत्तात्रय पाटील, उपशाखाप्रमुख संतोष जावळे,सचिव नागेश बनसोडे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.यावेळी नवनियुक्त शाखाप्रमुख व पदाधिकारी यांचे अभिनंदन करुन पक्षवाढिसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शहरप्रमुख सलीम शेख ,शिवदूत महेबूब गवंडी, कास्तीचे शाखाप्रमुख राजेंद्र रवळे,माजी उपसरपंच उमाकांत जाधव ,नवनियुक्त शाखाप्रमुख दत्तात्रय पाटिल,उपशाखाप्रमुख संतोष जावळे,सचिव नागेश बनसोडे,ग्रा.सदस्य जयराम शेवाळे ,आकाश जावळे ,पप्पू जाधव, प्रमोद चंदनशिवे, काकासाहेब जाधव, चंद्रशेखर जावळे ,विक्रम जावळे, बालाजी जावळे ,महेश पाटील, सुरज जाधव ,गोपाळ मोरे, दत्ता जाधव ,अमोल वरवटे ,सोमनाथ घोडके ,पांडुरंग कुंभार , राजेंद्र पवार , शरद पाटील, पवन जाधव ,महादेव दूधभाते ,पप्पू सोनवणे ,संजय पाटील, पप्पू मडोळे, नेताजी चंदनशिवे , गोविंद हजारे ,बालाजी मोरे, रामा घोडके तसेच अनेक शिवसैनिक उपस्थित होते.