श्री तुळजा भवानी मंदिरात पारंपारिक पद्धतीने नागपंचमी साजरी 

तुळजापूर :- महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेच्या मंदिरात संपुर्ण वर्षभरात हिंदू धर्मातील सर्व धार्मिक सणवार उत्सव मोठ्या उत्साहात व पारंपारिक पद्धतीने साजरी होत असतात.नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे.कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते.


त्यानुसारच प्रतिवर्षाप्रमाणे आज दि.२१/०८/२०२३ रोजी श्री तुळजा भवानी मातेच्या पुजेत देविच्या कपाळावरती हे शेषनागाचे चित्र काढून मळवटाची सजावट करण्यात आली. तसेच मंदिरातील होमकुंडासमोर नागदेवतेच्या मुर्तीची ही स्थापना करण्यात आली.प्रथेप्रमाणे त्याचे पुजन पाळीवाला भोपे पुजारी व मंदिर व्यवस्थापक यांच्या हस्ते करण्यात आली.मंदिरचे तहसिलदार तथा व्यवस्थापक संतोषजी पाटील, यावेळी धाराशिव जिल्हा शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख तथा भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम,भोपे पुजारी अतुल मलबा,विनोद सोंजी,युवराज भैय्ये कदम,नागेश कदम,रोहित कदम,सुशांत कदम हजर होते.

हिंदू धर्मात नाग पंचमीला विशेष महत्त्व आहे. नागपंचमीच्या दिवशी सुख-समृद्धीसाठी नागांची पूजा केली जाते. ज्या लोकांच्या कुंडलीत काल सर्प दोष आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवता सोबत शंकर देवाची पूजा करावी.यामुळे कार्ल सर्प दोषाचा प्रभाव कमी होतो असा समज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!