रस्ता रोको आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर नारंगवाडी सह 17 महसूल मंडळाला 25% अग्रीम रक्कम देण्यास मंजुरी – अनिल जगताप यांची माहीती

✅ धाराशिव जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळांना 25 टक्के अग्रीम रक्कम देण्यासाठी आज नारंगवाडी रोड येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते तत्पूर्वी आजच धाराशिव जिल्ह्यातील 17 महसूल मंडळांना अग्रीम रक्कम देण्यास मंजुरी देण्यात आली आहे तशी खाली सूचना जिल्हाधिकारी धाराशिव यांनी काढलेली आहे.
घटनाक्रम……
1️⃣ 5 सप्टेंबरला अप्पर मुख्य सचिव श्री अनुप कुमार यांची मंत्रालयात भेट घेऊन सतरा महसूल मंडळांना अग्रीम देण्याची विनंती केली
2️⃣ 11 सप्टेंबरला नारायणवाडी येथे माझा सत्कार रस्ता रोको आंदोलनाची दिशा ठरवली लागली संध्याकाळी कृषी सहसंचालक यांचे जिल्हा कृषी अधीक्षक यांना पत्र नारंगवाडी महसूल मंडळ सामावून घेण्यासाठी क्षत्रिय तपासणी करण्याचे दिले आदेश.
3️⃣ १२ सप्टेंबरला जिल्हाधिकारी यांनी जिल्हास्तरीय तातडीची बैठक बोलावून नारंगवाडी सह 17 महसूल मंडळात 25 टक्के अग्रीम रक्कम देण्याविषयी सर्वेक्षणाची दिले आदेश.
4️⃣ 15 सप्टेंबर पर्यंत सर्व तालुका कृषी अधिकारी कडून अहवाल सादर पंचवीस टक्के अग्रीम रक्कम देण्याबाबत सर्व तालुका कृषी अधिकारी सकारात्मक.
5️⃣ आज अखेर धाराशिव जिल्ह्यातील 17 महसूल मंडळांना 25 टक्के अग्रीम रक्कम देण्याविषयीची जिल्हाधिकारी यांच्याकडून अधिसूचना जारी.
रस्ता रोको आंदोलनाच्या जनक्याने धाराशिव जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळातील एक लाख 72 हजार 292 शेतकऱ्यांना न्याय मिळाला बळीराजाचा विजय झाला.
माननीय जिल्हाधिकारी धाराशिव डॉक्टर सचिन ओंबासे साहेब ,तसेच जिल्हा कृषी अधिकारी श्री माने साहेब त्यांचे सर्व सहकारी ,पोलीस निरीक्षक उमरगा श्री दिलीपराव पारेकर, माननीय उपविभागीय अधिकारी उमरगा ,माननीय तहसीलदार उमरगा व या आंदोलनासाठी साथ दिलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम पडेपर्यंत संघर्ष सुरूच राहील. राष्ट्रवादीचे माजी उपाध्यक्ष अनिल जगताप असे यांनी सांगितले आहे.