माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 1000 शालेय विद्यार्थाना फळे व खाऊ वाटप

लोहारा : शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा तालुका शिवसेनेच्या वतिने शालेय विद्यार्थाना फळे व खाऊ वाटप
ईरशाळवाडी येथे झालेल्या दुर्घटेमुळे मा.उद्धव ठाकरे यांनी कोठेही बॅनरबाजी अतिउत्साही प्रकारे वाढदिवस साजरा न करण्याच्या दिलेल्या आदेशाप्रमाणे होणारा अनावश्यक खर्च टाळुन लहाण मुलांना फळे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा शहरातील केंद्रिय प्राथमीक प्रशाला लोहारा व कै.वसंतराव काळे माध्यमीक विद्यालय लोहारा येथे १००० विद्यार्थाना फळे व खाऊचे वाटप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार यांनी विद्यार्थाना व शिक्षकांना संबोधित केले.महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोणा काळात केलेले कार्य,मुंबईतील कोरोणा काळातील धारावि पॅटर्णचा आदर्श जगभरात कसा घेण्यात आला.मुख्यमंत्री म्हणुन कार्य करताना भारतातील ५ आदर्श मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव साहेबांचा नंबर त्यांनी जनतेला आपन कुटुंबप्रमुख म्हणुन सांभाळे याचाही उल्लेख बोलताना केला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, लोहारा पं.स.माजी सभापती विलास भंडारे,शिवसेना शहरप्रमुख सलिम शेख,माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके,माजी नगरसेवक शाम नारायणकर,माजी ग्रा.पं.सदस्य महेबुब गवंडी,सोशल मिडीया तालुका प्रमुख प्रेम लांडगे,नागराळचे शाखाप्रमुख पिंटु गोरे, बेंडकाळचे शाखाप्रमुख अनिल गोरे,माजी सदस्य वि.का.से.सो. रघुविर घोडके,माजी उपसरपंच मोघा नितीन जाधव,दिनेश गरड,महेश चपळे,थोरात,जि.प.चे मुख्याध्यापक मधुकर रोडगे,पांढरे सर,साळुंखे सर,राठोड मॅडम,कै.वसंतदादा काळे माध्यमीक विद्यालयाचे मुख्याध्यापक पंडीत खराडे,समाधान मोरे , शेवाळे मॅडम,यासह दोन्ही शाळेचे शिक्षक, कर्मचारी यासह शिवसैनीक उपस्थित होते.