कानेगाव येथील जलजीवन मिशनच्या कामाचे आमदार ज्ञानराज चोगुले यांच्या हस्ते भूमिपुजन

लोहारा : आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नांतून कानेगाव ता.लोहारा गावासाठी मंजूर असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना राबविणे – १२ कोटी रु. व तीर्थक्षेत्र विकास निधीतून मारुती महाराज मंदिर परिसर विकसित करणे – २० लक्ष रु. या कामांचे शनिवार दि.१५ रोजी त्यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले.
याशिवाय चालू कार्यकाळात आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यामार्फत कानेगाव साठी 2515, 2225, आमदार निधी, मग्रारोहयो, तांडा वस्ती सुधार योजना, जनसुविधा आदी योजनांच्या माध्यमातून अंतर्गत सिमेंट रस्ते, गटारी, सभागृह, सभागृह दुरुस्ती, स्मशानभूमी, विंधन विहीर, शेतरस्ते आदी कामांसाठी सुमारे 2 कोटी रुपयांचा निधी मंजुर असुन यातील काही कामे पूर्ण झाली असून इतर कामे प्रगतीपथावर आहेत. यापुढील काळातही ग्रामस्थांच्या मागणीनुसार निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमास शिवसेना तालुकाप्रमुख जगन पाटील, उपसरपंच सुभाष कदम, नितीन पाटील, उपतालुकाप्रमुख प्रताप लोभे, मा.गटनेते अभिमान खराडे, नगरसेवक अविनाश माळी, मनोहर कदम, बाळू हांडोळे, हरी कदम, चंद्रकांत कदम, दीपक रोडगे, प्रमोद बंगले, श्रीकांत भरारे, परवेज तांबोळी, राजेंद्र अडसुळे, बळी जगताप, प्रताप कदम, लिंबराज पाटील, बालाजी कदम, सुखराज पाटील, राम कदम, दत्ता मोरे, यांच्यासह भजनी मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.