लोहारा शहरात लिंगायत समाजाच्या वतीने खा. ओमराजे निंबाळकर यांचा सत्कार

लोहारा : खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभेतील चालू हिवाळी अधिवेशनात लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मांडल्याबद्दल लोहारा शहरातील बसवेश्वर मंदीरात रविवारी १८ डिसेंबर रोजी लिंगायत समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष नागण्णा वकील, माजी सरपंच शंकर जट्टे, तालुका देखरेख संघाचे माजी चेअरमन दत्तात्रय बिराजदार ,शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख सलिम शेख,महेबुब गवंडी, युवक कॉग्रेसचे शहरध्यक्ष हरी लोखंडे, जगदिश लांडगे,नामदेव लोभे,संजय दरेकर,युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, नगरसेविका मयुरी बिराजदार,सधीर घोडके,किरण पाटील, पवन मोरे,पप्पु स्वामी,बंडाप्पा वैरागकर,अप्पु स्वामी, बालाजी माशाळकर, सुनिल ठेले,गणेश काडगावे,प्रेम लांडगे यांच्यासह आदी उपस्थित होते.