भातांगळी, सास्तुर व कोंडजीगड येथे पोलीसांची अवैध मद्य विरोधी कारवाई

लोहारा : लोहारा पोलीस ठाण्याच्या पथकास भातांगळी, ता. लोहारा येथील- मालन तेलंग हे 14.00 वा. सु. भातांगळी येथील समाज मंदीर समोर एकुण 45 लि. अंबवलेला द्रव पदार्थ अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या, तर सास्तुर, ता. लोहारा येथील सुशील सरवदे तर कोंडजीगड, ता. लोहारा येथील- विध्यासागर बिराजदार हे दोघे 14.30 ते 16.30 वा. सु. कोंडजीगड शिवारात भाउसाहेब बिराजदार साखर कारखान्या समोर एकुण 81 देशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.