दिपावली पाडव्याच्या मुहूर्तावर उमरग्यात रस्ता कामाचे भूमिपूजन

उमरगा ( उस्मानाबाद) : आज दिपावली पाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून उमरगा शहरासाठी मंजूर करून घेतलेल्या 10 कोटी रुपयांच्या कामांचे, साने गुरुजी नगर मधील अंतर्गत रस्ते, महाराष्ट्र गणेश मंडळ रस्ता, डॉ.के.डी. शेंडगे शाळेकडे जाणारा रस्ता, व आरोग्य नगर मधील रस्ता आदी कामांचे माजी खा. प्रा.रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, उमरगा बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, युवा नेते किरण गायकवाड, उमरगा बाजार समितीचे मुख्य प्रशासक सुलतान शेठ, तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, अमृत वरनाळे, बप्पा हराळकर, हणमंत डावरगे, माने गुरुजी, धारूरकर गुरुजी, रत्नाकांत सगर, सचिन आळंगे, डॉ. विजय पाटील, डॉ. तात्याराव थिटे, डॉ.पोफळे, डॉ. उदय मोरे, डॉ.दिपा मोरे, डॉ. बाबरे, डॉ.सचिन शेंडगे, डॉ.अजित शिंदे, डॉ. सचिन तावशीकर, डॉ.सतीश नरवडे, डॉ. सचिन शिंदे, डॉ. यतीराज बिराजदार, ऍड.चिंचोळीकर, डॉ.वाघमोडे,विरंचे पाटील, डॉ.स्वामी, इंगोले सर, सुभाष येळीकर, धनंजय मुसांडे, अरुण जगताप, शशिकांत शिंदे, अशोक आळंगे, अविनाश देशमुख, लक्ष्मण टोम्पे, रवी इंगोले, राम शिरगुरे, ऍड.अहंकारी, रंजीत चव्हाण, बसू स्वामी, श्याम कांबळे, सचिन देशमुख, तळीखेडे, सतीश मुगळे, सचिन शिंदे, विनोद कोराळे, शरद पवार, गोपाळ जाधव, भगत माळी, देवा चव्हाण, गोविंद दंडगुले, बाळू सुरवसे आदी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते.