धाराशिव

ज्ञानज्योती महिला सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज

लोहारा (प्रतिनिधी) : ज्ञानज्योती महिला सहकारी पतसंस्था लि., धाराशिव शाखा – लोहारा यांची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा आज शुक्रवार, दि. 26 सप्टेंबर रोजी बसवेश्वर मंदिर, लोहारा येथे पार पडणार आहे.

या सभेसोबतच ज्ञानज्योती सामाजिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित गौरी महालक्ष्मी सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा सोहळा देखील होणार असून, या कार्यक्रमामुळे सभेला सांस्कृतिक व सामाजिक रंग प्राप्त होणार आहे.

या वेळी संस्थेच्या कामकाजाचा आढावा, आर्थिक अहवाल, तसेच भावी योजना मांडण्यात येणार आहेत. संस्थेचे सर्व सभासद, कर्जदार, ठेवीदार आणि महालक्ष्मी सजावट स्पर्धेत सहभागी स्पर्धक यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन पतसंस्थेच्या चेअरमन ॲड. आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांनी केले आहे 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!