रोटरी क्लब ऑफ लातूर मेट्रोच्या वतीने शिलाई मशीन वितरण व सन्मान सोहळा संपन्न

लातुर : दिनांक 25 जून 2023 रोजी रोटरी क्लब ऑफ लातूर मेट्रोच्या वतीने शिलाई मशीन वितरण व सन्मान सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. प्रदीपजी राठी चेअरमन लातूर अर्बन बँक , प्रमुख अतिथी मा. मु.का.अ. अभिनव गोयल जी,  माजी प्रांतपाल डॉक्टर हरिप्रसाद सोमाणीजी आणि सहाय्यक प्रांतपाल मा. ऍड नंदकिशोर लोयाजी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

रोटरी क्लब ऑफ लातूर मेट्रोचे सन्माननीय सचिव देवेंद्रजी आयलाने यांनी प्रास्ताविक मध्ये रोटरीचे कार्य सविस्तर मांडले. तसेच अध्यक्ष रो. नागनाथजी आगवाने यांनी आपल्या मनोगतात शिलाई मशीन वाटपाचे उद्देश सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन रो. विजय कोळीजी यांनी गरीब व होतकरू 11 महिलांची निवड यादी जाहीर केली आणि मान्यवरांच्या हस्ते शिलाई मशीन वितरण करण्यात आले.
प्रमुख अतिथी मा. अभिनव गोयलजी यांनी मार्गदर्शन करताना रोटरीच्या निस्वार्थ सेवेबद्दल कौतुक करत स्वतः आजोबापासून रोटरीचे सदस्य असल्याचे सांगितले आणि या कार्यक्रमास आल्यामुळे एका कुटुंबात आल्याचे समाधान व्यक्त केले.
         तसेच सर्व प्रमुख पाहुण्यांनी आपली मनोगते व्यक्त करून सर्व लाभार्थ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून समाधान व्यक्त केले आणि रोटरीच्या सर्व सदस्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शनाची धुरा मा. रो. विष्णूजी कोल्हे यांनी समर्थपणे सांभाळली आणि सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. रो. रविकिरणजी व सौ. पूजा रवीकिरण चव्हाणजी यांनी अतिशय सुंदरपणे केले.
कार्यक्रमाची सुरुवातस राष्ट्रगीत व दीपप्रज्वलनाने झाली आणि समारोप पसायदान व अल्पोपहाराने करण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!