लोहारा शहरातील हिंदवी जगदीश लांडगे हिचा सत्कार

लोहारा / इकबाल मुल्ला
लोहारा शहराच्या प्रथम नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा जगदिश लांडगे यांची मुलगी हिंदवी जगदीश लांडगे हिने NEET UG 2023 मध्ये 571 गुण घेवून घवघवीत यश संपादन केल्याने मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी गणपतराव लांडगे, मद्रास लांडगे, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, जगदंबा खरेदी विक्री सह. संस्था चेअरमन भगवान पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, तलाठी जगदिश लांडगे, प्रेम लांडगे, उपस्थित होते.