आता प्रभाग 5 मधील अतिक्रमण हटवण्याची भावसार समजाची मागणी

लोहारा – प्रतिनिधी

लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी लोहारा शहरातील समस्त भावसार समाजाच्या वतीने तहसीलदार व मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून या निवेदनात असे म्हटले आहे की प्रभाग क्र ५ मध्ये नवीन नगरपंचायत कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे, या ठिकाणी मोठी अशी इमारत उभी करण्यात येणार असून या भागातील नागरीक येण्या जाण्यासाठी या जागेचा पर्यायी रस्ता म्हणून वापर करत होते, कारण या मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले असून त्यामुळे येथील नागरिकांना येण्याजाण्यासाठी मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ हटवून या परिसरातील नागरिकांना रस्ता खुला करून द्यावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे, यावर भावसार समाज अध्यक्ष संतोष माळवदकर, उपाध्यक्ष गंगाधर झिंगाडे, सचिव अक्षय माळवदकर,शिवराज झिंगाडे, विशाल झिंगाडे,प्रशांत माळवदकर, बालाजी झिंगाडे,राम उपरे,विश्वजित उपरे,दिगंबर भिंगे,सुरज माळवदकर, नागेश माळवदकर, अमोल झिंगाडे, दत्तात्रय माळवदकर, शुभम पुकाळे,गगन माळवदकर, राजकुमार माळवदकर, किरण माळवदकर, रतन माळवदकर, सुधाकर माळवदकर, सत्यम हचाटे, अशोक हचाटे,सुमित झिंगाडे, आरुण माळवदकर, सुरेश झिंगाडे,आदींच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!