कॉग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे विजयी

दिल्ली : कॉग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे हे विजयी झाले आहेत. कॉग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक 25 वर्षांनंतर झाली आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांना 7897 मते मिळाली. तर थरूर यांच्या पारड्यात 1072 मते पडली आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 9385 जणांनी मतदान झाले होते. काँग्रेसचे नुतन अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शशी थरुर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे . याबाबतची औपचारिक घोषणा लवकरच करण्यात येणार आहे .
काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर यांनी खर्गे यांचे अभिनंदन केले आहे. गांधी कुटुंबीयाबाहेरील व्यक्ती काँग्रेस अध्यक्षपदी आता असणार आहे. नुतन अध्यक्ष हे कॉग्रेसला नवसंजविनी कसे देणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.