लोहारा / उमरगा : आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नातून मौजे.जेवळी ता.लोहारा येथे क्रिडा संकुल उभारणे 05 कोटी रुपये व जेवळी ते तुगाव या रस्त्याचे डांबरीकरण करणे 50 लक्ष रुपये या कामाचे दि.22/09/2024 रोजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते युवा सेना मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड व जिल्हाप्रमुख मोहन पणुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन संपन्न झाले.

आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नातून भव्य क्रिडा संकुल उभारणे या कामासाठी 500 लक्ष रुपये व जेवळी ते तुगाव या रस्त्याचे डांबरीकरण करणे या कामासाठी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

क्रिडा संकुलासाठी मंजूर झालेल्या 5 कोटी रुपयांमध्ये प्रामुख्याने बहु उद्देशिय इमारत(Multipurpose Building) ज्यामध्ये बॅडमिंटन हॉल, प्रशासक कक्ष, अधिकारी कक्ष, फिटनेस सेंटर, योगा हॉल, इनडोअर खेळासाठी हॉल, साहित्य कक्ष, मेडिकल कक्ष, स्त्री व पुरुष यांकरिता स्वतंत्र ड्रेसिंग रूम व शौचालय, स्वागत कक्ष व इतर अनुषंगिक बाबी, संरक्षक भिंत, पाण्याच्या सुविधे करिता बोअरवेल, पाण्याची टाकी व इतर अनुषंगिक बाबी, मुख्य रस्त्यावरून क्रिडा संकुलासाठी मुख्य प्रवेशा करिता CD Work यासह इतर अनुषंगिक कामे करण्यात येणार आहेत.

याव्यतिरिक्त भविष्यात शॉपिंग कॉम्प्लेक्स, ६ लेन असलेला ४०० मीटर चा Athlete ट्रॅक, लाँग जंप ग्राउंड, अंतर्गत रस्ते , व्हॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, कब्बडी ग्राउंड, Lawn Tennis Ground, खो खो ग्राउंड, उर्वरित संरक्षक भिंत व इतर आवश्यक बाबी साठी निधीची गरज आहे.
सदर उर्वरित कामांसाठी लागणारा निधी भविष्यात मीच उपलब्ध करून देईन असा विश्वास आमदार ज्ञानराज चौगुले यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थितांना दिला.
आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सदर कामांसाठी निधी मंजूर करून दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी लोहारा न.पं.नगराध्यक्षा वैशालीताई खराडे, भाजपा कळंब तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, लोहारा तालुका प्रमुख जगन पाटील, उमरगा तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे,लातुर माजी उपमहापैर चंद्रकांत बिराजदार, सा.बां. उपविभागीय अभियंता संतोष घोडके, शाखा अभियंता जमीर पठाण, माजी नगरसेवक अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब शेख, मुरुमचे शेखर मुदकन्ना, सरपंच सौ.महांनंदा पणुरे, उपसरपंच बसवराज कारभारी, अशोक भुसणे, रमेश साखरे, शरणप्पा हावळे, चंद्रकांत ढोबळे, महेश दरेकर, ग्रा.स.विजया गाडेकर, सुनिता स्वामी, लोहारा नगरपंचायत नगरसेविका सारीका बंगले,आरती कोरे, नगरसेवक अमीन सुंबेकर, गौस मोमीन, के. डी. पाटील, दीपक रोडगे, श्रीकांत भरारे, दिनकर जावळे पाटील, अरुण जगताप, प्रताप लोभे, सरपंच सागर पाटील, परवेज तांबोळी,ओम कोरे, श्रीशैल ओवांडे, लोहारा व उमरगा उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button
error: Content is protected !!