खा.राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाचे हिंजवडी येथे आंदोलन

हिंजवडी : ( प्रतिनिधी )
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रे दरम्यान अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ राहुल गांधींच्या विरोधात हिंजवाडीत भाजप कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चा, पुणे ग्रामीणचे सरचिटणीस जीवन युवराज साखरे व मुळशी तालुका अध्यक्ष विनायक ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करत काँग्रेस विरोधात घोषणाबाजी केली.

सावरकरांच्या बाबतीत अपमानास्पद जेवढे काही करता येईल तेवढे काँग्रेसने केले आहे. केवळ कालचं विधान नाही तर स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काँग्रेसला जेवढे काही शक्य होईल ते ते अपमानास्पद काँग्रेस करत असून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या निष्ठा, श्रद्धा आणि देशप्रेम याच्यावर जेवढे आक्रमण करता येईल तेवढे काँग्रेसने केले आहे अशी प्रतिक्रिया तालुका अध्यक्ष विनायक ठोंबरे यांनी दिली.


या आंदोलनात सहकार आघाडी पुणे जिल्हा संघटक सोपान निबुदे, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष मिंनाथ कानगुडे,उपाध्यक्ष भाजप मुळशी तालुका तानाजीनाना हुलावळे, भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रेम साखरे,भाजपा मुळशी तालुका उपाध्यक्ष संतोष मांदळे, संजय जाधव, सचिन सावळे, सतीश कांबळे, सुभाष मालपोटे, नितीन नवले, रितेश साखरे व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—–

राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जाणूनबुजून अपमान करत आहेत हा अपमान म्हणजे सावरकरांचा आणि देशभक्त भारतीयांचा अपमान आहे. ज्या महाराष्ट्रात या सुपुत्राचा जन्म झाला त्या महाराष्ट्राचा अपमान राहुल गांधी करत आहेत, एक मराठी माणूस ज्याने भारताच्या स्वातंत्र्यासाठी काळ्यापाण्याची शिक्षा भोगली त्या सावरकरांचा अपमान म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. या घटनेची दखल घेऊन प्रखर राष्ट्रभक्त असणारे सावरकरजी यांची प्रतिमा मलीण केल्या प्रकरणी राहुल गांधी यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा.
जीवन युवराज साखरे
सरचिटणीस
पुणे जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!