कै.भीमराव नाईक माध्य व उच्च माध्यमिक आश्रम शाळेची उज्वल निकालाची परंपरा कायम

लोहारा : लोहारा तालुक्यातील होळी येथील कै.भीमराव नाईक माध्य व उच्च माध्यमिक आश्रम शाळेने याही वर्षी आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली असून बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेचा निकाल ९७.६७ टक्के तर कला शाखेचा निकाल ९६.४४ टक्के इतका लागला आहे.
विज्ञान शाखेतून विशेष प्राविण्य १, प्रथम श्रेणी १५, द्वितीय श्रेणी २३ तृतीय श्रेणी ३ असे एकूण ४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच कला शाखेतून प्रथम श्रेणी ८ द्वितीय श्रेणी २४, तृतीय श्रेणी २ असे एकूण ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विज्ञान शाखेतून निकिता सुरेश चव्हाण ७६.३३ टक्के प्रथम, अर्जुन राम राठोड ७४ टक्के द्वितीय तर निकिता रामराव राठोड ७० टक्के गुण घेऊन ही विद्यार्थिनी तृतीय आली आहे. कला शाखेतून मिनाक्षी गुलकंद गायकवाड ६८.३३ टक्के प्रथम, नारायण बसप्पा बिराजदार ६४ टक्के द्वितीय, तर गीता शत्रुघ्न काळे ६३.३७ टक्के गुण घेऊन ही विद्यार्थिनी तृतीय आली आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष बाबुराव राठोड, संचालक डॉ.संजय राठोड, अजित राठोड, सुमनताई राठोड, प्राचार्य टी. डी. डोंबाळे यांनी अभिनंदन केले आहे.