लोहारा (दि. १२ सप्टेंबर) : श्री जयलक्ष्मी माऊली ज्वेलर्स यांच्या वतीने लोहारा पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना व पोलीस कर्मचार्यांना शुद्ध पाणी पिण्यासाठी ब्लू स्टार कंपनीचा वॉटर कुलर भेट देण्यात आला.
या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार व सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. ज्वेलर्सचे मालक अविनाश माळी यांनी सांगितले की, “पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना व कर्मचार्यांना शुद्ध पाणी मिळावे, ही आमची छोटीशी सामाजिक बांधिलकी आहे.”
दरम्यान, याच कार्यक्रमात १५ जुलै रोजी झालेल्या ज्वेलर्स दुकान फोडी प्रकरणातील अंदाजे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल न्यायालयीन आदेशानुसार परत करण्यात आला. यात जोडवे, ब्रासलेट, वाले, चैन, अंगठ्या, कडे, ताट आदी चांदीच्या वस्तूंचा समावेश होता.
या प्रसंगी ज्वेलर्सचे मालक अविनाश माळी, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, शिवसेना नेते राजेंद्र माळी, सराफ संघटना तालुकाध्यक्ष संभाजी पोतदार, पं.स. माजी सदस्य इंद्रजीत लोमटे, दिपक रोडगे, तंटामुक्ती अध्यक्ष आप्पासाहेब पाटील (मार्डी), माजी गटनेते अभिमान खराडे, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, सोसायटी चेअरमन बालाजी बाबळे (मोघा), ग्रामपंचायत सदस्य नारायण क्षीरसागर (हिप्परगा रवा), राजेंद्र सुर्यवंशी, राजेंद्र पाटील, शाम राठोड, शहरातील ज्वेलर्स दुकानदार अहेमद शेख, पिंटु पोतदार, महेश पोतदार, दत्ता पोतदार, शुभम महामुनी, ज्ञानेश्वर काडगावे उपस्थित होते.
तसेच पोलीस कर्मचारी निरंजन माळी, आकाश भोसले, अर्जुन तिगाडे, ज्योतीराम भोजने, माधव कोळी, मधुकर पवार, सुनिल मोरे, होमगार्ड बिलाल गवंडी, अजहर सिद्दीकी, प्रकाश कोकरे, योगेश परसे यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.