स्वाधार संस्थेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन सण साजरा

उस्मानाबाद : प्रतिवर्षीप्रमाणे या ही वर्षी स्वआधार मतिमंद मुलींचा निवासी प्रकल्प, विमानतळ रोड आळणी ता. जि. उस्मानाबाद येथे बालगृहातील दिव्यांग मुलींनी स्वतः तयार केलेल्या पर्यावरण पूरक राख्यांचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. अतुलजी कुलकर्णी साहेब ( जिल्हा पोलीस अधीक्षक उस्मानाबाद) , मा.श्री कैलासदादा पाटील (कळंब उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघांचे आमदार, मा.सौ.अस्मिता ओंबासे मॅडम , डॉ ए.डी.कदम साहेब (बालन्यय मंडळ) ॲड. सौ.सुजाता माळी मॅडम, (बालकल्याण समिती सदस्य), ॲड सौ. दिपाली जहागीरदार मॅडम, ॲड. मैना भोसले मॅडम, (बाल कल्याण समिती सदस्य),मा श्री राणाप्रताप देशमुख (बार्शी), मा श्री विष्णू इंगळे, नॅशनल दलित मुव्हमेंट संघटना, आधुनिक लहुजी शक्ती सेना, भारतीय लहुजी पॅंथर सेना उस्मानाबाद तसेच संस्था प्रमुख मा.श्री. चव्हाण सर, मा. श्री. थोडसरे सर (मुख्याध्यापक), तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व बालगृहातील सर्व मुली उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.श्री. चव्हाण सर यांनी तर सूत्रसंचालन श्रीमती. कांबळे मॅडम यांनी केले.