शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेच्या माध्यमातुन खुट्टेपड यांच्या विवाहात ५ ग्रॅम सोन्याची अंगठी व भरपेरावा आहेर

HTML img Tag Simply Easy Learning
लोहारा : बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेचा शिवसेना  ठाकरे  गटाच्या नगरसेविका मयुरी बिराजदार व युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांच्यातर्फे खुट्टेपड यांच्या विवाहात पाच ग्रॅम सोन्याची अंगठी व भरपेरावा आहेर करण्यात आला आहे.
लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधिल सामान्य कुटूंबातील मुलीच्या  कन्यादानासाठी सामाजीक बांधिलकी जपत आपलाही काही हातभार रहावा. या हेतुने ही योजना सुरवात करण्यात आली आहे. या योजणेच्या माध्यमातून ५ ग्राम सोन्याची अंगठी रघुविर घोडके यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यात खा. ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते देऊन या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. त्यानंतर सोमनाथ निर्मळे यांच्या मुलीच्या विवाहात पाच ग्रॅम सोन्याची अंगठी व भरपेरावा आहेर करण्यात आला. याच प्रभागातील रहेमान खुट्टेपड यांची मुलगी शमिन यांचा विवाह होता. याप्रसंगी पाच ग्रॅम सोन्याची अंगठी व भरपेरावा आहेर करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ प्रभाग क्रमाक ६ मधिल सर्वसामान्य कुटूंबीयांना होणार आहे.

या पुर्विही प्रभाग ६ मधिल नागरीकांसाठी ते रहात असलेल्या घराच्या घरपट्टित कै.विश्वनाथराव गायकवाड कर सवलत योजनेच्या माध्यमातुन १० टक्के सुट देण्यात येते आहे. माजी सरपंच शंकर जट्टे,तालुका देखरेख संघाचे माजी चेेअरमन दत्तात्रय बिराजदार,माजी ग्रा.पं.सदस्य महेबुब गंवडी,प्रकाश भगत,पत्रकार आब्बास शेख, सोसायटीचे माजी संचालक रघुविर घोडके, मुन्ना जाधव, दयानंद स्वामी, अविनाश रसाळ, शिवकुमार बिराजदार, ओमकार बिराजदार,रहेमान खुट्टेपड,मुस्तफा खुट्टेपड, मज्जीत खुट्टेपड,माहामुद खुट्टेपड यांची उपस्थिती होती.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!