लोहारा शहर महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीची निवड

लोहारा दि.२७ (प्रतिनिधी) जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी ओम पाटील उपाध्यक्षपदी विरभद्र फावडे,सचिवपदी गणेश पालके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
लोहारा शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात येते.यंदा ही विविध सामाजिक उपक्रमांनी महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्याचे आयोजन केले आहे.
दि.२२ रोजी ध्वज पुजन,प्रतिमा पुजन,किर्तन दि.२३ रोजी शहर व परिसरातील शिव भजनी मंडळाचे भजन दि.२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शिवनगर मिरवणूक कार्यक्रम आयोजित केले आहे.
जयंतीनिमित्त महात्मा बसवेश्वर मंदिरात माजी सरपंच नागण्णा वकील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

बैठकीत पुढील प्रमाणे जयंती उत्सव समिती कार्यकारणी जाहीर करण्यात आली.कोषाध्यक्ष गणेश कोप्पा,सहसचिव बाळु माशाळकर,मिरवणूक प्रमुख अमोल बिराजदार,रोहित नारायणकर तर जालिंदर कोकणे, केडी पाटील, विक्रांत संगशेट्टी, हरी लोखंडे, बापु जट्टे,वैजीनाथ बिराजदार,अंकुश नारायणकर,ऍड राजु माशाळकर,कमलाकर मुळे,ओंकार घोगडे,समर्थ कुंभार, महेश पाटील,राजु स्वामी आदींच्या सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी बैठकीला शंकर अण्णा जट्टे, दत्ता बिराजदार,शरणाप्पा जट्टे,बलू स्वामी,वैजीनाथ जट्टे, शांतिवीर अप्पा जट्टे, मल्लिनाथ घोंगडे, वैजीनाथ होंडराव,सोमनाथ जट्टे,मल्लिनाथ बनशेट्टी,राजशेखर माणिकशेट्टी,बाळासाहेब कोरे,बसवराज जट्टे,बसवराज बिडवे, मुन्ना माशाळकर,विकास होंडराव,राजु जट्टे, श्रीशैल्य मिटकरी, दयानंद स्वामी,ओम कोरे,कपिल माशाळकर,राजु कोराळे,महेश कुंभार,किरण तोडकरी, प्रसाद मिटकरी यांच्यासह शहरातील नागरीक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!