लोहारा ग्रामीण रुग्णालयात झाले स्त्री जन्माचे स्वागत

लोहारा : आज शुक्रवारी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनांचे औचित्य साधून व सूंदर माझा दवाखाना या मोहीम अंतर्गत लोहारा ग्रामीण रुग्णालय येथे आंतर्गत व बाह्य परिसर स्वछता करण्यात आली.
तसेच सर्वांसाठी समान आरोग्य सुविधा , सर्वांसाठी आरोग्य या प्रमाणे धन्वंतरी पूजन करून स्त्री जन्माचे स्वागत म्हणून रुग्णालयात प्रसूती झालेल्या मातांचा व बालकांचा सन्मान ( बाळंतविडा) देऊन करण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning

यावेळी लोहारा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ वैशालिताई खराडे, उपनगराध्यक्ष श्री आयुब शेख, नगरसेविका सौ. सारिका बंगले, सौ. आरती कोरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोविंद साठे, डॉ. इरफान शेख, श्री.अंगद गिराम, घोडके सिस्टर, रीना सिस्टर, वाकले सिस्टर, साळुंके सिस्टर, लोंढे सिस्टर , आदिनाथ फुलसुंदर, अमोल वाघमारे, बप्पा वाघमारे, अनिता टिकम्बरे,रमेश ठेले, उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ICTC समुपदेशक श्री प्रविण कांबळे यांनी केले तर आभार घोडके सिस्टर यांनी मानले.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!