वाडी वडगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आ.चौगुले यांच्याकडून 50 हजार रुपयाची मदत

लोहारा : लोहारा तालुक्यातील वाडी वडगाव येथील शेतकरी कै. बसवराज लकडे (वय – 42 ) यांनी रविवार दि.21 मे रोजी सततच्या नापिकीला कंटाळून आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या केली होती. यांनतर सदर कुटुंबातील मुलांचे शिक्षण व उदर निर्वाहासाठी गावातील नागरिकांनी पुढाकार घेवून मदतीचे आवाहन केले होते

उमरगा – लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी रविवार दि.28 रोजी सदर कुटुंबाची भेट घेवून सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत सुपुर्द केली. तसेच पुढील प्रशासकीय कार्यवाही तात्काळ पूर्ण करून शासकिय मदत मिळवुन देण्यासाठीही प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, लोहारा तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, सुरेश दंडगुले, बबन फुलसुंदर, अंकुश भुजबळ, अपास भुजबळ, संजय भुजबळ, राजेंद्र माळी, संतोष लकडे, पंडित पवार, सुभाष गिराम आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!