आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते दूध संकलन आणि शीतकरण केंद्राचे उद्घाटन

सुधीर कोरे
जेवळी, ( ता.लोहारा )
जेवळी (ता. लोहारा) येथे भारत सरकार राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड अंतर्गत मदर डेरीचे अधिकृत कामधेनु दूध संकलन आणि शीतकरण केंद्राचे उद्घाटन आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते पार पडले
मदर डेरीचे तालुक्यात पहिले व जवळपास पाच हजार लिटर दूध संकलन क्षमत असले कामधेनु दूध संकलन आणि शीतकरण केंद्राचे उद्घाटन सोमवारी (ता.२७) आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते पार पडले या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुसिद्धेश्वर विरक्त मठाचे मठाधीश मनिप्र गंगाधर महास्वामीजी हे होते या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, लोहारा तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, उमरगा तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, उपसरपंच बसवराज कारभारी, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड दिपक जवळगे, गुंडाप्पा भुजबळ,अविनाश माळी, ओम कोरे, मदर डेरीचे एरिया अधिकारी आप्पासाहेब वाघ (उमरगा), धर्मेंद्र ठाकूर (धाराशिव), माजी सरपंच चंद्रकांत साखरे, दिलीप पाटील, माजी उपसरपंच मल्लिनाथ डिग्गे, महादेव जायफळे, रामहरी वाकडे, लिंबणप्पा कारभारी, शिवराम हावळे, राजशंकर वेलदोडे, साहेबलाल शेख, कामधेनु दूध संकलनाचे मुख्य प्रवर्तक बसवराज साखरे, ओमकार डिग्गे, बालाजी तळवशे, वैजनाथ डिग्गे, दिलीप डिग्गे आदींची उपस्थिती होती.