लोहारा शहरात भाजपाच्या नुतन पदधिकाऱ्यांचा सत्कार

लोहारा/प्रतिनिधी
भाजपा लोहारा तालुकाध्यक्षपदी शिवशंकर हत्तरगे, जिल्हा कोषाध्यक्षपदी नेताजी शिंदे यांची निवड झाल्याबद्दल लोहारा शहरात भाजपाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेटी, ओबीसी मोर्चा माजी जिल्हा उपाध्यक्ष दगडु तिगाडे, माजी भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, माजी जिल्हा कार्यकारिणी सदस्य कमलाकर सिरसाठ, सतिश गिरी, शिवा थोरात, माजी ओबीसी मोर्चा जिल्हा चिटणीस विजय महानुर, बाबा सुंबेकर, खंडू जाधव, अन्वर शहा, परमेश्वर माशाळकर, यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.