लामजना येथे तुकाराम बीज साजरी

किल्लारी :- औसा तालुक्यातील वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेल्या लामजना (माळ्याचा मळा-जुना लामजना ) येथे गुरुवार दिनांक 9 मार्च रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज उत्साहात साजरी करण्यात आली.
3 मार्च ते 9 मार्च दरम्यान चालणाऱ्या तुकाराम बीज सप्ताह सोहळ्यात ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ, कीर्तन, काकडा आरती ,गुरुभजन अशा अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
लामजना आणि परिसरातील भजनी मंडळ व महिला भजनी मंडळाच्या वतीने संगीत भजनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विरपक्ष महाराज कानेगावकर यांचे काल्याचे कीर्तन पार पडले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेवनसिद्ध माळकोंडजे ,लक्ष्मण शिंदे, मुगळे सुजाता ,तुकाराम कारभारी, अनिल पवार, नामदेव माळी ,बाबुराव बिराजदार ,ज्ञानेश्वर माळी,वैजीनाथ डिगुळे, गणेश बिराजदार ,प्रशांत नेटके यांच्यासह लामजना येथील समाज बांधवानी सहकार्य केले.
यावेळी कार्यक्रमाला लामजना, तपसे चिंचोली, माळकोंडजी, उत्का ,गोटेवाडी ,हारेगाव, तसेच धाराशिव जिल्हयातलही नागरिकांनी हजेरी लावली होती.