उमरगा तहसिल कार्यालयासमोर आज कॉग्रेसचा रास्ता रोको आंदोलन

उमरगा : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाया रचलेल्या राज्यघटना आणि लोकशाही व्यवस्थेची हत्या करण्याचे षडयंत्र केंद्र सरकार करीत आहे. या दडपशाहीचा धिक्कार असो!! याचा निषेध करण्याकरीता महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवारी दिनांक 25/3/2023 रोजी दुपारी 12.30 वाजता उमरगा तहसिल कार्यालया समोर रास्ता रोको आंदोलन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप भालेराव, उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार,महीला कांग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ.संगीताताई कडगंचे यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात येणार आहे तरी कांग्रेस पक्षाच्या सर्व सेलचे पदाधिकारी,आजी माजी सभापती, उपसभापती, नगरसेवक, सरपंच,चेअरमन,व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे अवाहन उमरगा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड.सभाष राजोळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!