लोहारा शहरात भाजपाची बुथ सक्षमीकरण अभियान संदर्भात बैठक संपन्न

इकबाल मुल्ला
लोहारा / प्रतिनिधी
लोहारा शहरातील जगदंबा मंदिर येथे दि.25 मार्च 2023 रोजी लोहारा तालुका भाजपाची बुथ सक्षमीकरण अभियान संदर्भात भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
यावेळी प्रमुख म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा समन्वयक नेताजी पाटील, सोशल मिडिया प्रदेश कार्यकारिणी सदस्य पांडुरंग पवार, युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मकरंद पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, अदि, उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा समन्वयक नेताजी पाटील, मकरंद पाटील, यांनी कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शुभम साठे, पं.स. माजी सदस्य वामन डावरे, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी सोनटक्के, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, कल्याण ढगे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य कमलाकर सिरसाठ, संपत देवकर, सुरेंद्र काळाआप्पा, युवराज जाधव, नंदन थोरात, शुभम गोस्वी, भरत जाधव, संतोष मुरटे, दशरथ हंकारे, योगेश बाभळे, रमेश भुरे, यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.