लोहारा शहरात अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने गुणवंताचा सत्कार

लोहारा : लोहारा शहरातील वाघमोडे हॉस्पिटल मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त विस्तार अधिकारी मनोहर वाघमोडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गुणवंत वाघमोडे,ॲड.संध्या तिगाडे, ए.बी. पांढरे, तुकाराम विरोधे, बालाजी इरूदे हे होते.        अहिल्यादेवीच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करून नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल विरेश गोपीनाथ मैंदाड, ॠतुजा राम काडगावे, हिंदवी जगदीश लांडगे, दहावीतील यशाबद्दल आदिती अंकुश बंडगर ह्यांचा जयंती उत्सव समितीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते शाल,पुष्पगुच्छ,अहिल्यादेवीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी पालक गोपीनाथ मैंदाड,जगदीश लांडगे,अंकुश बंडगर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जयंती उत्सवात रक्तदान यशस्वी केल्याबद्दल उत्कृष्ट नियोजनाबद्दल प्रातिनिधीक स्वरूपात अध्यक्ष प्रेम लांडगे, आकाश विरोधे, संदीप घोडके,राहुल विरोधे यांचा सत्कार व सर्व पदाधिकारी, समितीचे मान्यवरांनी अभिनंदन केले.

यावेळी अशोक घोडके, रघुवीर घोडके, महेश वाघे, प्रताप घोडके,माणिक तिगाडे,सलीम शेख, महेबुब गवंडी,माणिक भोसले,शिवा चपळे,नरहरी माळी, उमेश देवकर, विजय महानगर, प्रशांत थोरात,पाटील सर,कृष्णा इरूदे, अनिल इरूदे, जे.के.बायस,निळकंठ कांबळे, गिरीश भगत, सुरेश वाघमोडे, विकास घोडके हे उपस्थित होते.यावेळी मनोहर वाघमोडे, अप्पा पांढरे, गुणवंत वाघमोडे,संध्या तिगाडे यांनी सर्वांनाना मार्गदर्शन केले. सत्कार मुर्ती विरेश मैंदाड,ॠतुजा काडगावे यांनी पुढील काळात आम्ही समाजॠण फेडण्याचा प्रयत्न करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासह मदत करू अशी ग्वाही दिली.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रेम लांडगे, अशोक घोडके, रघुवीर घोडके, आकाश विरोधे, शिवा चपळे,अनिल विरोधे, जयसिंग बंडगर, गोपाळ वाघमोडे,वैभव घोडके यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विकास घोडके यांनी केले तर आभार सुरेश वाघमोडे यांनी मांडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!