श्रीहरीकोटा अंतरिक्ष सहल जिल्हास्तरीय निवड चाचणीमध्ये लोहारा जिल्हा परिषद शाळेच्या दोन विद्यार्थ्याची निवड 

लोहारा ( जि.धाराशिव ) : अंतरिक्ष सहल जिल्हास्तर स्पर्धा परीक्षेत लोहारा शहरातील जिल्हा परीषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील इयत्ता सहावी वर्गातील कु. सिमरन रसूल शेख व इयत्ता सातवी वर्गातील कु. संध्या खंडू शिंदे यांची निवड झाली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

सिमरन रसूल शेख

सिमरन रसूल शेख हिने या अंतरिक्ष सहल विज्ञान स्पर्धा जिल्ह्यात झालेल्या स्पर्धेत आपले व शाळेचे स्थान कायम अव्वल टिकवून जिल्हयात 74 गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला व संध्या खंडू शिंदे हिने 64 गुण प्राप्त केले. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संध्या खंडू शिंदे

या सहलीसाठी दि.20 मार्च 2023 रोजी उस्मानाबाद (डायट) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद येथे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून जिल्हयातून एकूण प्रत्येक तालुक्यातून तीन असे एकूण 24 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

यासाठी शाळास्तरावर विज्ञान शिक्षक श्री. श्रीशैल जट्टे , जहीरुद्दीन शेख , प्रविण शिंदे , प्रताप साळूंके व मुख्याध्यापक श्री. मधूकर रोडगे व शिक्षकांनी मार्गदर्शन केले. यासाठी प्रेरणास्त्रोत लोहारा तालुका गटशिक्षणाधिकारी रंजना मैंदर्गी ,बीटच्या विस्तार अधिकारी श्री चव्हाण ,भास्कर बेशकराव व शाळा व्यवस्थापन समिती यांनीही शुभेच्छा देऊन शाळेचे अभिनंदन केले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!