कै. अनिल व्यंकटराव पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणनिमित्त विद्यार्थ्यांना टिफीन डबा वाटप

जेवळी ता.लोहारा /  सुधीर कोरे

शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष कै. अनिल व्यंकटराव पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्ताने शनिवारी (ता.१८) त्यांच्या परिवाराच्या वतीने दक्षिण जेवळी (ता. लोहारा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना टिफीन डबा भेट दिला.

यावेळी पाटील परिवाराचे व्याही दिग्रसचे माजी सरपंच शंकरराव पाटील, सौ. शैलजा शंकरराव पाटील, पाटील परिवाराचे जावई तथा मंत्रालय मुंबई येथे कार्यरत कक्ष अधिकारी संतोष शंकरराव पाटील, सुकन्या सौ.अंकिता संतोष पाटील पोलिस पाटील किसनराव खोबरे (नदी हत्तरगा), सुपुत्र अनिकेत पाटील व अभिषेक पाटील, श्रीशैल्य शिवलाल वानेगाव (खजुरी), ह.भ.प.कमलाकर कोळी गुरुजी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवराज चिनगुंडे,

ग्रामपंचायत सदस्य विवेकानंद बिराजदार, शालेय समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब तांबडे, मुख्याध्यापक देवीदास साळूंके, शिक्षक सुधीर येणेगुरे, दौलप्पा तोरकडे, शिवाजी जेवळीकर, संजय तांबडे, आशिष साखरे, भिमाशंकर (भय्या) साखरे, पत्रकार सुधीर कोरे, पत्रकार बसवराज होनाजे, मल्लिनाथ साखरे, रमेश निंगशेट्टी, दिलीप चौगुले, व्यंकट माणिकशेट्टी, संगप्पा मुखे, ईलाही मुल्ला, वैजिनाथ कारभारी, बसवराज स्वामी, नागनाथ गुंजोटे यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, उपस्थित होते.

या कार्यक्रमाऐ सुत्रसंचलन सुधीर येणेगुरे तर आभार मुख्याध्यापक देवीदास साळूंके यांनी मानला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!