लातुर : स्प्रिंग डेल पब्लिक स्कूल मध्ये दिपावली निमित्त दीपोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.नारसिंगजी आयलाने साहेब,प्रमुख पाहुणे सचिव विनोदजी जटाळ साहेब तसेच शाळेचे आधारस्तंभ मातोश्री शोभाताई आयलाने उपस्थित होते.यावेळी दिपावली निमित्त सर्व विद्यार्थ्यांनी आकर्षक स्वतः बनवलेले आकाश कंदील तर महिला पालकांनी दीपोत्सवासाठी पणती घेऊन आले.यातूनच एक दिवा देशासाठी,एक दिवा जवनांसाठी ,एक दिवा स्वतः साठी हा संदेश दीपोत्सवाच्या माध्यमातून देण्यात आला.

असेच संस्थेचे अध्यक्ष आयलाने साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना फटाके मुक्त दीपावली साजरी करावी आसा संदेश दिला.तसेच विद्यार्थ्यांना दिपावली सुट्टीमध्ये मनोरंजन आणि आत्मविश्वास वाढवा यासाठी दिपावली वर्कशीट देऊन अभ्यासासाठी प्रोत्साहित केले.सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने भेटवस्तू देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे प्राचार्य श्री चव्हाण सर यांनी केले.तर आभार प्रदर्शन शाळेचे समन्वयक राजश्री आयलाने मॅडम यांनी केले.यावेळी सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी सहभाग घेतला .

Back to top button
error: Content is protected !!