धानुरी येथे नाम जप सोहळा संपन्न

लोहारा : तालुक्यातील धानुरी येथे अंनत श्री विभूषीत जगद़गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नानिजधाम यांच्या धाराशिव जिल्हा सेवा समिती च्या वातिने व तालूका सेवा समीती च्या अंतर्गत सेवा केंद्र धानोरी येथे सेवा केंद्राच्या १७ व्या वर्धापन दिना निमित्त श्री चा नाम जप सोहळ्याचे आयोजन (दि.४) सकाळी ११ वाजता सपन्न झाले आहे.
तालुक्यातील धानुरी येथे जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्ये ज. न. म. प्रवचनकार भालचंद्र चौधरी प्रबोधनकार यांचे अमृततुल्य असे प्रबोधन झाले. रात्री ८ वाजता कार्यक्रमाची सांगता आरतीने व उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसाद वाटपाने सांगता झाली.
यावेळी लोहारा तालुका सेवा समितीचे अध्यक्ष अशोक जाधव, तालुका महिला अध्यक्ष कमल खंडाळे, तालुका कॅप्टन नागनाथ काकडे, तालुका धर्मक्षेत्र प्रमुख सिद्धांत साळुंके, आध्यात्मिक प्रमुख वसंत जाधव व धानोरी सेवा केंद्र अध्यक्ष नेताजी सुरवसे, बालाजी पाटील, यांच्या हस्ते जि. प. शाळेतील गरजू इयत्ता १ ली ते थी च्या विद्यार्थ्यांना १५० वही व पेन वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सेवा केंद्र अध्यक्ष, सेवा केंद्र कमिटी, व ग्रामस्थ आदीनी परिश्रम घेतले. यावेळी परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.