प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देण्याची मागणी

उस्मानाबाद : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत अर्ज दाखल केलेल्या लाभार्थ्यांना लाभ देण्याची मागणी दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे बुधवारी करण्यात आली आहे.
निवेदनात असे म्हटले आहे. की, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत लोहारा तालुक्यातील 150 ते 200 लाभधारक यापासून वंचित आहेत. अर्ज करून तीन वर्षे ओलांडून गेली, तरीसुद्धा याचा लाभ भेटला नाही .(1)आधार कार्ड चा प्रॉब्लेम (2) बँक अकाउंट चा प्रॉब्लेम असे सांगत आहे .परंतु या कागदपत्राची बरोबर पूर्तता करूनही ऑनलाईन अपडेट करत नाहीत, आतापर्यंत अर्जदारांनी चार ते पाच वेळेस कागदपत्र दिलेली आहे परंतु ,ऑनलाईन अपडेट न केल्यामुळे तेच प्रॉब्लेम दाखवत आहेत. कागदपत्र जमा केलेल्या आशा कार्यकर्त्यांना विचारले असता आम्ही त्या त्या वेळी जमा केलेलं आहे असे सांगतात.व तालुक्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारले असता ऑपरेटर काम करत नाहीत असे सांगतात .तालुका वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून जबाबदारीने काम करून घेत नाहीत व त्यांच्या हलगर्जीपणामुळेच अर्जदारापर्यंत हा लाभ भेटत नसल्याचे दिसून येत आहे.
ही योजना देशात बहुसंख्य गरीब महिलांना स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोलमजुरी करावी लागते,त्यामुळे अशा महिलांना त्या गर्भवती असताना गरोदरपणात अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत स्वतःची पोट भरण्यासाठी मजुरी करावी लागते. त्यामुळे अशा गर्भवती महिलांना व त्यांच्या पोटात असणाऱ्या बाळाला त्यांच्या गरोदरपणात योग्य व सकस पोषक आहार मिळत नाहीत परिणामी गर्भवती माता कुपोषित राहून त्यांच्यावर व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो व त्यामुळे गर्भवती मातेचा व त्यांच्या पोटात असलेल्या नवजात बालकांचा मृत्यू होण्याचा धोका वाढतो.तसेच प्रसूतीनंतर शारीरिक क्षमता नसताना सुद्धा मजुरी करावी लागते त्यामुळे माताचे शरीर पूर्णपणे बरे होण्यापासून रोखले जाते आणि पहिल्या सहा महिन्यात त्यांच्या लहान बाळाला केवळ स्तनपान देण्याच्या क्षमतेमध्ये अडथळा निर्माण होतो.कमी पोषणाच्या आहारामुळे बहुसंख्य महिलावर याचा विपरीत परिणाम होतो व आई कमी वजनाच्या बाळाला जन्म देते. त्यामुळे गर्भवती माता व त्यांच्या नवजात बालकांची व स्तनदा मातेची आरोग्य सुधारण्यासाठी तसेच त्यांना सकस पोषण आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी म्हणून ही योजना सुरुवात करण्यात आलेली आहे,परंतु संबंधित प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या योजनेचा लाभ अजूनही भेटत नाही.
जर या निवेदनाची दखल घेऊन कार्यवाही केली गेली नाही तर दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटनेच्या वतीने लोकशाही पद्धतीने आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष अमित सुरवसे,उपाध्यक्ष विकी शिंदे, सरचिटणीस प्रथमेश कांबळे,संघटक एकनाथ कांबळे, युवक तालुकाध्यक्ष योगेश सुरवसे, लोहारा शहराध्यक्ष रोहीत शिंदे, रोशन कांबळे, महेश कांबळे आदीच्या सह्या आहेत.