बाल कलाकारांनी विविध गीतावर बहारदार नृत्य आविष्कार सादर

HTML img Tag Simply Easy Learning
जेवळी,ता. लोहारा
(सुधीर कोरे)

भोसगा (ता. लोहारा) येथील डॉ. के डी शेंडगे इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात बाल कलाकारांनी विविध गीतावर बहारदार नृत्य आविष्कार सादर करुन उपस्थितीतांची मने जिंकली .
भोसगा (ता. लोहारा) येथील डॉ. के डी शेंडगे इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानावर मंगळवारी (ता.२८) पार पडलेल्या या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उदघाटन श्रीकृष्ण विद्यालय गुंजोटीचे माजी प्राचार्य जी.के. घोडके यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाच्य अध्यक्षस्थानी डॉ के डी शेंडगे इंग्लिश मीडियम स्कूल उमरगाचे प्राचार्य डी. बी. कुलकर्णी हे होते.

याप्रसंगी या इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य महेश शिवनेचारी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बालकलाकारांनी लोकगीत, लावणी, आदिवासी, देशभक्तीपर गीतासह विविध चित्रपट गाण्यावर बहारदार नृत्य सादर केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य महेश शिवनेचारी, शिक्षक ए. व्ही. पोतदार, योगेश वाघमोडे, मनोज कुलकर्णी, व्ही बी कुंभार, अनिता डावरे, दिपाली बलसुरे, प्रतीक्षा होर्टे, वर्षा कुंभार, पुनम दूधभाते, पुनम कांबळे, दिपाली शिंगाडे सोनाली टिकांबरे, स्मिता पाटील, प्रियंका बलसुरे आदींनी परिश्रम घेतले आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिपाली बलसुरे यांनी तर आभार ए. व्ही. पोतदार यांनी मानले आहे.

 

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!